Ad will apear here
Next
वर्धा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी
प्रातिनिधिक फोटो
वर्धा : येथील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र योजनेला मिळणारा वाढता प्रतिसाद बघता १७ जून रोजी केंद्र सरकारने १४९ ठिकाणी नवीन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये वर्धा पोस्ट ऑफिस केंद्र मंजूर झाल्याची माहिती वर्धा खासदार रामदास तडस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

वर्धा जिल्ह्याचे ठिकाण असूनही पासपोर्ट सेवा केंद्र नसल्याने नागरिकांना नागपूर प्रादेशिक कार्यालयात जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन खासदार रामदास तडस यांनी १६ नोव्हेंबर २०१६ रोजी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मेजर जनरल व्ही. के. सिंह यांनी लेखी उत्तरात, पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र योजनेचा भविष्यात विस्तार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याला अनुसरून खासदार रामदास तडस यांनी वेळोवेळी वर्धा येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याबाबत विनंती केली होती. परिणामी १४९ नवीन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र स्थापन करीत असताना त्यामध्ये प्रामुख्याने वर्ध्याचा समावेश करण्यात आला.

खासदार तडस यांनी या पासपोर्ट सेवा केंद्राचे कामकाज लवकरात लवकर सुरू करावे यासाठीदेखील परराष्ट्र मंत्रालयातील अवर सचिव श्री. शर्मा यांची भेट घेऊन विनंती केली होती. वर्धा येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र मंजूर करून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुद्दा निकाली काढल्याबद्दल खासदार तडस यांनी समाधान व्यक्त करून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि परराष्ट्र राज्यमंत्री मेजर जनरल व्ही. के. सिंग यांचे आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZUXBE
Similar Posts
‘अंगणवाडी केंद्राची संख्या वाढविणार’ वर्धा : ‘वर्धा जिल्ह्यासह अनेक ठिकाणी नवी अंगणवाडी केंद्रे स्थापन करण्याबाबत राज्य सरकार कार्यरत आहे. राज्य सरकारांना एक डिसेंबर २०१४च्या पत्रानुसार अंगणवाडी केंद्रे पुनश्च सुरू करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे,’ अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी लेखी उत्तरातून खासदार रामदास तडस यांना दिली
क्रीडा धोरण अंमलबजावणी समितीवर रामदास तडस यांची नियुक्ती महाराष्ट्र सरकारने राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रसार व जोपासना करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती २९ जुलै रोजी स्थापन केली आहे. वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार, तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस यांची या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
वर्धा येथील ‘लॅन्को’ प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची मागणी ‘वर्धा जिल्ह्यातील अनेक वर्षापासून रखडलेला लॅन्को प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने यात लक्ष घालावे,’ अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत दोन ऑगस्ट रोजी केली.
महाराष्ट्र-गोवा राज्यातील दूरसंचार आढावा बैठकीला खासदार तडस यांची उपस्थिती वर्धा : भारत संचार निगम लिमिटेडच्या महाराष्ट्र सर्कलतर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील सर्व संसद सदस्यांची आढावा बैठक सात जुलै रोजी मुंबई येथे पार पडली. या बैठकीमध्ये खासदार रामदास तडस यांनी वर्धा मतदारसंघातील अनेक समस्या मांडल्या. वर्धा लोकसभा मतदारसंघातील उपस्थित झालेल्या विषयांमध्ये प्रामुख्याने

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language